(रत्नागिरी)
जिल्ह्यातील लांजा येथे आजाराला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध केलेल्या वृद्धाचा उपचारांदरम्यान सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला. गुणाजी लक्ष्मण लांजेकर (७१, रा. लांजा, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
गुणाजी लांजेकर हे गेल्या ८ वर्षांपासून दम्याच्या आजाराने ग्रस्त होते. या आजाराला कंटाळूनच त्यांनी रविवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी राहत्या घरी उंदीर मारण्याची पेस्ट खाल्ली. काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम लांजा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारांदरम्यान सोमवारी मध्यरात्री १.४५ वा. त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.