(रत्नागिरी)
लांजा बाजारपेठेत वृद्ध महिला पडून डोक्याला मार लागला होता. या दुखापत झालेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्या महिलेला उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. चंद्रकला चंद्रकांत लिंगायत (वय ७२, रा. लिंगायतवाडी, कोलतेश्वर मंदिर, जवळ ता. लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे.
सदर घटना सोमवारी (ता. २०) तीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला लांजा बाजारपेठेत गेली असताना पडली. तिच्या डोक्याला मार लागून दुखापत झाली. उपचारासाठी तिला लांजा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.