(मुंबई / निलेश कोकमकर)
कोरोनो काळात ठप्प पडलेले जीवनमान पुन्हा एकदा रुळावर येऊ लागले आहे. कोकणातील पारंपरिक लोक कला जपणारे नमन पुन्हा सुरु होताच रसिकजनात नवीन आशा निर्माण होऊ लागल्या आहेत. गेली अनेक शतके आपल्या कोकणातील मातीतील हा वारसा संवर्धन करणारे रत्नागिरी जिल्हातील लांजा तालुक्यामधील सुप्रसिद्ध पौराणिक गणनाट्यची जोड असणारे, श्री जाकादेवी झांजगी नृत्य नमन मंडळ (रावारी) सर्वत्र हवे हवे वाटणारे खेळे आता अभिलाषा क्रीएशन मुंबई मार्फत रविवार दि. 12फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 8.00 वाजता आपल्या कोकणातील सर्व कलाकारांचे हक्काचं रंगमंच अर्थात दामोदर हॉल परेल (प्रभादेवी) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या विशेष म्हणजे विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान रावारी (मुंबई ) हा प्रयोग जवळजवळ हाऊसफुल्ल झालाच आहे. पारंपरिक शृंगारिक गौळणसहित, संगीतमय गण, वगनाट्य यमाचे गर्वहरण आणि विनोदी फारसा पटली रे पटली पांड्याला रंगीं पटली असा रसिकांसाठी मनोरंजनाची परवणीच ठरणाऱ्या नाट्य प्रयोगाचा अनुभवी व उत्तम व्यवस्थित जोड आहे. यामध्ये लेखक श्री. मनोहर घडशी, दिग्दर्शक श्री. नितेश आगरे, शुभम डांबरे, निर्माता जाकादेवी ग्रामविकास मंडळ रावारी, गायक सुशांत बाणे, संदेश आगरे कलाकार, रावारी गावचे यशस्वी कलाकार यांच्या सोबत असणाऱ्या संपूर्ण टीम खूप मेहनत घेऊन हे सादरीकरण करीत आहेत.