(रत्नागिरी/प्रतिनिधी)
केंद्र सरकारकडून शेतकर्यांसाठी पीएम किसान योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा लाभ चक्क सरकारी कर्मचारी घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कर्मचार्यांना नोटीसा पाठवून त्यांच्याकडून सर्व रक्कम वसुल करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हयात एकूण 4 हजार 24 जणांनी या योजनेचा लाभ घेतला. या अपात्र लोकांकडून आतापर्यंत 1 कोटी 34 लाखांची वसुली करण्यात आली आहे. शिवाय अजून पावणे दोन कोटींची वसुली करण्यात येणार आहे.
पंतप्रधान किसान योजनेचे जिह्यात 2,69,083 लाभार्थी आहेत. 2019 साली शेतकर्यांसाठी वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रूपयांची पेन्शन या योजनेअंतर्गत दिली जात आहे. या योजनेतील अपात्र लाभार्थीकडून लाभाची रक्कम वसूल करण्याची जबाबदारी प्रशासनातील कर्मचार्यांकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या वसुलीचा अहवाल शासनाकडे पाठवावा लागणार आहे. 4 कोटी 7 लाख 6 हजार रक्कम वसूल करावयाची आहे.