(बंगळुरू)
चेन्नई सुपर किंग्जने रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा ८ धावांनी पराभव केला. त्यांचा हा या मोसमातील तिसरा विजय आहे. चेन्नईचे आता ५ सामन्यांत सहा गुण झाले आहेत. त्याचवेळी आरसीबीचा हा तिसरा पराभव आहे. त्यांचे ४ गुण आहेत.
बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ही रोमांचक लढत पाहायला मिळाली. सुरुवातीला चेन्नईच्या फलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना चांगलेच धुतले. त्यामुळे चेन्नई संघाने ६ गडी गमावून २२६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आरसीबीनेही चांगली फटकेबाजी करीत जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटच्या टप्प्यात घसरगुंडी झाल्याने आरसीबीला २१९ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे चेन्नईने ८ धावांनी सामना जिंकला.
चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. पहिल्यांदा फलंदाजी करत चेन्नईने २० षटकांत ६ गडी गमावून २२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ निर्धारित षटकांत फक्त २१९ धावाच करू शकला. अखेरच्या षटकात चेन्नईने आरसीबीवर ८ धावांनी विजय मिळवला. बंगळुरूसाठी झालेल्या या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने ३३ चेंडूत ६२ धावा आणि ग्लेन मॅक्सवेलने ३६ चेंडूत ७६ धावा केल्या, मात्र दोघांनाही आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.
चेन्नई संघासाठी डेव्हन कॉनवेने ८३ धावा केल्या. शिवम दुबेनेही २७ चेंडूत ५२ धावा केल्या. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डुप्लेसीने ६२ आणि ग्लेन मॅक्सवेलने ७६ धावा केल्या. या दोघांमधील १२६ धावांची भागीदारीही बंगळुरूला विजय मिळवून देऊ शकली नाही. महिष तिक्ष्णाने ग्लेन मॅक्सवेलला एमएस धोनीकडे विकेटच्या मागे झेलबाद करून ही भागीदारी तोडली. मॅक्सवेलने अवघ्या ३६ चेंडूंत ३ चौकार आणि ८ षटकारांसह ७६ धावा केल्या. १४व्या षटकात मोईन अलीच्या शेवटच्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसही धोनीच्या हाती झेलबाद. डू प्लेसिसने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावा केल्या. डु प्लेसिस बाद झाला तेव्हा आरसीबीची धावसंख्या १४ षटकांत ४ बाद १५९ अशी होती.
चेन्नईने आपल्या डावात १७ षटकार ठोकले. २२६ धावा ही एम चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB विरुद्ध कोणत्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. याबाबतीत चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा विक्रम मोडला आहे. २००८ मध्ये कोलकाताने तीन गड्यांच्या मोबदल्यात २२२ धावा केल्या होत्या. त्याचवेळी, राजस्थान रॉयल्सने २०१८ मध्ये चार विकेट गमावत २१७ धावा केल्या होत्या.