(मुंबई)
भारतीय तंत्रशिक्षण संस्था हे उद्योजकतेचं केंद्र बनायला हवं आणि विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार देणारे होण्याची महत्वाकांक्षा बाळगायला हवी, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. आयआयटी मुंबईमध्ये ‘प्रारंभ समारंभ २०२३’ ला संबोधित करताना ते बोलत होते.
आयआयटी ह्या केवळ शैक्षणिक संस्था न राहता, लोककल्याणाच्या प्रयोगशाळा बनायला हव्यात, असं ते यावेळी म्हणाले. होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक सुभासिस चौधरी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. आयआयटी मुंबईच्या सिनेटने या वर्षीपासून संस्थेच्या दीक्षांत समारंभाची संकल्पना बदलून, त्या जागी प्रारंभ समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाला अडीच हजार विद्यार्थी हजर होते.