(खेड / भरत निकम )
खेड रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावर सुनील रोहिदास चव्हाण या २८ वर्षीय तरुणास धमकावून त्याच्या अंगावरचा टी शर्ट फाडत तहसीलदार कार्यालयात तुझ्यावर चाकूने वार करुन तुला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी शैलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड येथील सुनील रोहिदास चव्हाण हा स्वतःकडील दुचाकीने घरी जात असताना संध्याकाळी ५:३० च्या सूमारास शैलेश चव्हाण याने दुचाकीचा रस्ता अडवून तुझ्यावर गुन्हा दाखल करुनही तुझी मस्ती जिरली नाही का? तु नजर वर करुन माझ्याकडे बघायचे नाही. तुझ्यासोबत बरीच पोर असतील परंतु, मला घाबरुन रहायचे असे बोलून घिसाड्या मादर… यापुढे नीट रहा, असे बोलून शिविगाळ करीत अंगावरील टी शर्ट हाताने फाडून टाकले. त्यानंतर तहसीलदार कार्यालय येथे तुझ्यावर चाकूने वार करुन तुला ठार मारुन टाकीन, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात भादवि कलम ३४१, ४२७, ५०४ व ५०६ अन्वये शैलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.