(रत्नागिरी)
राष्ट्र सेवा दलाच्या सामाजिक सलोखा सप्ताहाच्या निमित्ताने रत्नागिरी येथील मारुती मंदिर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेचे सामुहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सर्व प्रथम छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव अभिजित हेगशेट्ये यांनी उद्बोधन करताना साने गुरुजींच्या उपोषणाची आठवण करून देत म्हणाले महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर चे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी १ ते १० मे १९४७ या काळात उपोषण केले. आणि मंदिर दिलातांसह सर्वांना खुले झाले. या घटनेला आज ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. हाच वारसा पुढे नेण्यासाठी राष्ट्र सेवा दल ३ मे ते १० मे २०२२ या कालावधीत सामाजिक सलोखा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
सप्ताहाच्या निमित्ताने रत्नागिरी येथे साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ‘ या प्रार्थनेचा समुह गायनाचा कार्यक्रम आयोजित केला या शिंदे, सीमा हेगशेट्ये, भैय्या वणजू, राधा वणजू, विनोद वायंगणकर, शकिल मजगांवकर त्याचबरोबर राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.