(रत्नागिरी)
संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. ९ डिसेंबर १९४६ रोजी आपल्या संविधान बनविण्याचे काम सुरू झाले. सतत २ वर्ष ११ महीने १८ दिवस काम करून अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या संविधानाचे काम पूर्ण झाले. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारले. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने २०१५ पासून हा दिवस सर्वत्र शाळा, कॉलेजेस, शासकीय कार्यालय तसेच समाजामध्ये साजरा व्हावा, संविधानाबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विविध GR देखील काढले. त्यानुसार हा कार्यक्रम अनेक शासकीय कार्यालयातही होत असतो.
राष्ट्रीय सेवा समिती रत्नागिरी व अधिवक्ता परिषद रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शनिवार दिनांक २६.११.२०२२ रोजी सायं. ६.०० वा.माधवराव मुळ्ये भवन,श्रीमान पांडुरंग जगन्नाथ वैद्य सभागृह, झाडगाव, रत्नागिरी येथे साजरा करणार आहोत यावेळी अँड आशिष आठवले, शिक्षण प्रमुख, कोकण विभाग, संस्कृत भारती, यांचे “भारताचे संविधान” या विषयावर उद्धबोधन होणार आहे.
तरी नागरिकांनी अवश्य या राष्ट्रीय दिनानिमित्त मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संतोष पावरी(अध्यक्ष, राष्ट्रीय सेवा समिती, रत्नागिरी) व अँड. मनोहर जैन(अध्यक्ष,अधिवक्ता परिषद रत्नागिरी तालुका) यांनी केले आहे.