वैभव पवार, गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील तलाठी कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष सहाय्य योजनेचे कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून दारिद्र्यरेषेखालील 18 ते 59 वयाच्या प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर रुपये 20000 चे अनुदानाचा लाभ देण्यात येते. मालगुंड येथील एकूण सहा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप महसूल विभागातर्फे तहसिलदार शशिकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात आले.
यावेळी मंडळ अधिकारी सुरेंद्र कांबळे, अव्वल कारकून सागर शिंदे, ग्राम विकास अधिकारी नाथा पाटील, तलाठी रोहित पाठक, कोतवाल सुशिल दुर्गवळी आदी उपस्थित होते. यावेळी सहा लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजारच्या धनादेशाचे वाटप रत्नागिरीचे नायब तहसीलदार मिलिंद देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये मालगुंड गणपतीपुळे येथील सहा लाभार्थ्यांमध्ये इंदिरा भिकाजी गुरव, अस्मिता अजित दुर्गवळी, रसिका रविंद्र शिवगण, मयुरेश मारुती पवार, शर्मिला शरण पाटील, रसिका रघुनाथ पालये या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवांतर्गत शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सध्या महसूल विभागातर्फे करण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने मालगुंड येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष सहाय्य योजने चे कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब याचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आलाव.