(चिपळूण)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खा. शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी चित्राताई चव्हाण यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संसदरत्न खासदार व कार्यकारी अध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या सुचनेनुसार महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
मुंबई प्रदेश कार्यालय येथे चित्राताई चव्हाण यांनी गेले पाच वर्षे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून केले, काम व राबविलेले विविध उपक्रम यांची दखल घेऊन पुन्हा एकदा महिला जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड केल्याचे प्रदेश महिलाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी सांगून शुभेच्छा दिल्या.
या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक बबन कनावजे, प्रदेश सरचिटणीस व माजी जि. प. सदस्य बारक्याशेठ बने आदी उपस्थित होत. चित्राताई चव्हाण या शरद पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून पवार परिवाराशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. अडचणीच्या काळात त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर संघटनेची अधिक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.