(चिपळूण /ओंकार रेळेकर)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार रमेशभाई कदम यांचे विश्वासू सहकारी, कट्टर समर्थक रईसभाई अलवी यांची निवड करण्यात आली आहे.
समाजकारण करताना अनेकदा दूरदृष्टी ठेवून पक्षाच्या हिताचे, समाजाच्या विकासाचे, समाज्याच्या उन्नतीचे, सरकारी यंत्रणेच्या समन्वयातून सर्वसामान्यापर्यंत विकास कामे, योजना, तसेच समाजातील गरजवंत सहकार्याचा हात देणारा, समाजिक, वैद्यकीय शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात काम करणारा, संघटन कौशल्य असणारा एक कार्यकर्ता, सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीची निवड झाल्याबद्दल सर्वत्र समाधान व अभिनंदन व्यक्त होत आहे.
पक्षाच्या उन्नतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, उज्वल भविष्यासाठी, माझ्यावर दिलेले जबबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन, असे रईसभाई.अलवी यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल अनेक.मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.