(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील रानपाट शाळेत शिक्षकदिनी विद्यार्थी शिक्षक बनून दिवसभराचे अध्यापनाचे काम यशस्वीरित्या संपन्न केले. या विद्यार्थी शिक्षकांचे शिक्षक व ग्रामस्थांनी खास कौतुक करून अभिनंदन केले.
शाळा रानपाट येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती तथा “शिक्षकदिन” साजरा करण्यात आला. प्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी स्टाफ मिटिंग घेऊन दिवसभराच्या कार्यवाहीचे नियोजन बाबत चर्चा केली. इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून वर्गावर शिकवण्याचे काम केले. दुपारनंतर कामकाज आटोपल्यावर सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती रानपाट येथील अध्यक्षा सौ. पायल रावणंग, सदस्या सौ. भक्ती रावणंग, सौ. उन्नती गोनबरे यांनी वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्याना शिक्षकी भूमिकेतून वर्गकाम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. भितळे, सहकारी शिक्षक श्री. मनोज जाधव, अजय माने, प्रिती गोनबरे यांचेसह विद्यार्थी भक्ती मोरे, श्रावणी गोनबरे, शर्वरी मोरे, तनुश्री मोरे, निखिल गोनबरे, सोहम गोनबरे, श्रेयस गोनबरे, उत्कर्ष गोनबरे आणि श्रेयस रावणंग यांनी विशेष मेहनत घेतली.