(खेड / वार्ताहर)
राज्य सरकारच्या पत्रकारांसाठी असलेल्या राज्य अधिस्वीकृतीच्या कोकण विभागीय समितीवर सदस्य म्हणून खेडअधील दैनिक रत्नागिरी टाइम्सचे जेष्ठ पत्रकार दिलीप सखाराम देवळेकर यांची निवड झाली आहे. याबद्दल जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कोकण विभागीय अधीस्विकृती समितीवर असेलल्या पाच सदस्यांपैकी खेड तालुक्यातील पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये दैनिक रत्नागिरी टाइम्सचे अभ्यासू, महाराष्ट्रातून अनेक उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त व ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांची या समितीवर नियुक्ती महाराष्ट्र सरकार मार्फत केली गेली आहे. दिलीप देवळेकर हे एक उच्च शिक्षित पत्रकार म्हणून परिचयाचे आहेत.