राज्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्युच्या संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक करत, लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र तरी देखील रूग्णसंख्येत वाढ सुरूच आहे.
गुरुवारी दिवसभरात राज्यात ६७ हजार १३ करोनाबाधित वाढले असून, ५६८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.५३ टक्के एवढा आहे. याशिवाय गुरुवारी ६२ हजार २९८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३३,३०,७४७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३४ टक्के एवढे झाले आहे.