(मुंबई)
शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या महिनाभरात पुन्हा बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि पशूसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून बदली झाली आहे. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या कार्यालयातील सचिव राजेंद्र क्षीरसागर यांची मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जलाज शर्मा यांना नेमण्यात आले आहे. बदली होण्यापूर्वी नाशिक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या गंगाधरन डी. यांची मुंबई महापालिकेत सह आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. शिंदे सरकारने गेल्या वर्षभरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी –
- राजेंद्र शंकर क्षीरसागर (मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव) यांची मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- वर्षा ठाकूर-घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड) यांची लातूर जिल्हाधिकारी,
- आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे) जळगाव जिल्हाधिकारी,
- बुवनेश्वरी एस (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे) वाशीम जिल्हाधिकारी,
- अजित कुंभार (सह आयुक्त, मुंबई महानगरपालिका) अकोला जिल्हाधिकारी,
- डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ) जालना जिल्हाधिकारी,
- डॉ. पंकज आशिया (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव) यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- कुमार आशीर्वाद (मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली झेडपी) सोलापूर जिल्हाधिकारी
- अभिनव गोयल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर) धुळे जिल्हाधिकारी
- सौरभ कटियार (मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अकोला) अमरावती जिल्हाधिकारी
- तृप्ती धोडमिसे (प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे) यांची सांगली झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी
- अंकित (प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली) जळगाव झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी
- शुभम गुप्ता (प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली पो. भारमरागड, गडचिरोली) धुळे झेडपी कार्यकारी अधिकारी
- मीनल करनवाल (प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार) नांदेड झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी
- डॉ. मैनाक घोष ( प्रकल्प अधिकारी गडचिरोली) यवतमाळ झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी
- मनीषा माणिकराव आव्हाळे (प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी सोलापूर) सोलापूर झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी
- सावन कुमार (प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती) नंदुरबार झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी
- अनमोल सागर (सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया) लातूर झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- आयुषी सिंह (प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार,पालघर) गडचिरोली झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी
- वैष्णवी बीव (सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा) अकोला झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी
- पवनीत कौर (जिल्हाधिकारी, अमरावती) संचालक – जी एस डी ए
- गंगाथरण डी (जिल्हाधिकारी, नाशिक) बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त
- अमोल जगन्नाथ येडगे ( जिल्हाधिकारी, यवतमाळ) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे
- शनमुगराजन एस (जिल्हाधिकारी, वाशिम) अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- विजय चंद्रकांत राठोड (जिल्हाधिकारी, जालना) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी मुंबई
- निमा अरोरा (जिल्हाधिकारी अकोला) संचालक, माहिती तंत्रज्ञान मुंबई
- वैभव दासू वाघमारे यांची प्रकल्प अधिकारी सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- आर.के.गावडे (नंदुरबार झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी) परभणी जिल्हाधिकारी
- आंचल गोयल (जिल्हाधिकारी, परभणी) यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका
- संजय खंदारे यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- जलज शर्मा (जिल्हाधिकारी धुळे) नाशिक जिल्हाधिकारी
- डॉ. ए.एन.करंजकर (राज्य कामगार विमा योजना मुंबई) नाशिक महापालिका आयुक्त
- आर.एस.चव्हाण (सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय) यांची मुख्य कार्यकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
- रुचेश जयवंशी यांची एनआरएलएम मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- पृथ्वीराज बी.पी. (लातूर जिल्हाधिकारी) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर
- मिलिंद शंभरकर (सोलापूर जिल्हाधिकारी) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई
- मकरंद देशमुख – उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ.बी.एन.बस्तेवाड मुख्य महाव्यवस्थापक (L&S), MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- संतोष सी. पाटील यांची उपमुख्यमंत्र्यांचे सह सचिव पदावरुन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली