(पुणे)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन रत्नागिरी येथे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. सदर अधिवेशनासाठी राज्य शासनाने या तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे. त्यानंतर शनिवारी व रविवारची सुट्टी जोडून आल्याने राज्यातील शाळा सलग पाच दिवस बंद राहणार असल्याची माहिती, शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आली आहे. अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांसाठी १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे. १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री व १९ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवसांची सुट्टी राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यातील सर्वात मोठी शिक्षक संघटना आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचे राज्यभरात दोन लाखाहून अधिक सभासद आहेत. शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनावेळी बहुसंख्य शिक्षक उपस्थित राहणार असल्याने राज्यातील शाळा बंद राहणार आहेत.