(मुंबई)
केंद्रातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या संयुक्त प्रवेशपूर्व परीक्षा (जेईई मेन) आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) ही परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील प्रवेशपूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षा जूनमध्ये होणार आहेत. त्यामध्ये एमएचटी-सीईटी यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात जेईई (JEE) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेच्या आयोजनामुळे MHT CET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन राज्याच्या सीईटी सेलने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
आता एमएचटी-सीईटी ५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे, तर अन्य सीईटी ३ ते १९ जून या कालावधीत होणार आहे. जेईई आणि एनईईटी या दोन परीक्षा एकाच वेळी आल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम हा महाराष्ट्राकडून घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटी परीक्षांवर झाला आहे. या परीक्षा लांबवणीवर पडल्या आहेत. संबंधित परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, याबाबतचे संकेत देखील मंत्र्यांनी आपल्या ट्विटमधून दिले होते. तसेच, परीक्षाबाबतच्या तारखा लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले. वास्तविक एमएचटी सीईटी २०२२ ही परीक्षा ११ जून ते १६ जून दरम्यान होणार होती. पण जेईई मेन २०२२ ही परीक्षा देखील जूनमध्येच सुरू होणार आहे. त्याचबरोबर १७ जुलैपासून एनईईटी ही परीक्षा होणार आहे. या दोन परीक्षामुळे एमएचटी सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे. उदय सामंत यांनी ट्विटमध्ये असे म्हटलंय की, JEE आणि NEET परीक्षांच्या मुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करू असे उदय सामंत यांनी सांगितले.