( रत्नागिरी / प्रतिनिधी )
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पाच दिवसीय निवासी जादूटोणा विरोध कायदा वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे १८ ते २२ जुलै २०२२ रोजी लोणावळा येथील श्री वागळ जैन चॅरिटेबल ट्रस्ट येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून पाच जणांची निवड झाली असून, ते कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. वक्त्यांना जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल सखोल माहिती व प्रशिक्षण कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक प्रा. श्याम मानव हे देणार आहेत.
या कार्यशाळेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून प्रा. मिलिंद कडवईकर, विलास डिके, प्रा. गुरुनाथ सुर्वे, सचिन तांबे, सदुप्पा कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.