[ पुणे ]
राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात नवा वाद होण्याची शक्यता आहे. वेगवेगळया पक्षाच्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी राज्यपालांच्या वक्त्यव्याचा निषेध नोंदवला आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली. ते म्हणाले, राज्यपालांच्या विधानातून त्यांनी मराठी माणसाला थेट व फार मोठा इशारा दिला आहे. या दृष्टीकोनातून कोणीच का पाहत नाही असा सवाल ही उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, आज ही सत्तेत असून त्यांनी महाराष्ट्रातील मराठा नेत्यांच्या राजकारणाला उघडं पाडलं आहे. या विधानातून त्यांनी काँग्रेस ncp ला टोला लगावला आहे. असं ही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मराठ्याची सत्ता म्हणायला लागलात पण त्यांच्या हातात व्यवहार देऊ शकले नाहीत. इथला व्यवहार हा आजही राजस्थान गुजरात्यांच्या हातात आहे. राज्यपालांनी झाकलेले डोळे उघडले आहेत. यातून मराठ्यांनी ठरवायचं आहे. नवीन नेतृत्व उभे करावे की बुजगवण्यासोबत राहावे. त्यामुळे राज्यपाल जे बोललेत ती सत्य परिस्थिती आहे, असं आंबेडकर म्हणाले.
राज्यपालांच्या विधानाबाबत त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी कोश्यारी यांच्या विधानाचं समर्थन ही केलं. “राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही. मी त्याच्या विधानाचं समर्थन करतो. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही. उलट राज्यातील नेत्यांचं राजकारण उघडं पाडलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यावरची झापडं उघडली”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.