राजापूर तालुक्यातील कुणबी आणि तत्सम समाजातील बांधवांसाठी काम करणारी एकमेव व सतत अ वर्ग मिळवणारी राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई या पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वनमाळी सभागृह दादर, मुंबई येथे रविवारी २० ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री रत्नाकर रायकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभासदांच्या गर्दीत पार पडली. या सभेस वार्षिक अहवाल वाचन, जमा- खर्च, कर्ज वाटप अशा पंधरा विषयावर चर्चा करून सभागृहातून सुचक अनुमोदक घेऊन सर्व विषय एकमताने मंजूर झाले.
पतसंस्था अध्यक्ष रत्नाकर रायकर, उपाध्यक्षा सौ. मिनाक्षी डोंगरकर यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे इयत्ता १० वी ते पदवीधर शिक्षणात उत्तम गुणवत्ता व अग्रेसर असणाऱ्या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संचालक श्री अरविंद डाफळे, भास्कर चव्हाण, दिपक इंगळे ,दिपक मोंडे ,सचित म्हात्रे, विजय भारती त्याच प्रमाणे पतसंस्थेला योगदान देणाऱ्या वय वर्ष ७५ असणाऱ्या पाच सभासदांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. या सभेला कायदेविषयक सल्लागार अँड सुभाष बाणे आणि ॲड शेटे तसेच मुंबई सहकारी बोर्ड लिमिटेडचे प्राचार्य हनुमंतराव फाळके, जी आर मांडवकर, अँड एस एम परवडे, केशव आरेकर, शिवाजी तेरवणकर चंद्रकांत सोगम, अनंत गोरुले यांनी सभासदांना व उपस्थित विद्यार्थी- पालक यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
संपूर्ण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर वारीक, व्यवस्थापक मनोज पुजारी आणि सर्व कर्मचारी वर्ग यांनी नियोजन बद्द करून पार पाडली. आभार प्रदर्शन संचालक भास्कर चव्हाण यांनी केले आणि राष्ट्रगीताने सभा समाप्त करण्यात आली.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !