(राजापूर)
दादर ते राजापूर रेल्वे स्टेशन असा तुतारी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची लॅपटॉपची बॅग चोरीस गेल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद केतन अजित चव्हाण (२३, नोकरी, हिंजवडी, पुणे, मूळ, देवरुख संगमेश्वर) याने राजापूर पोलीस ठाण्यात दिली.
ते प्रवासादरम्यान झोपलेला असताना अज्ञाताने लॅपटॉपची बॅग चोरुन नेली. यबाबत राजापूर पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.