(जैतापूर / वार्ताहर)
भंडारी समाज भजनी कलाकार मेळावा आयोजित, भंडारी समाज यांच्या वतीने श्री राकेश दांडेकर यांच्या निवासस्थानी जैतापूर येथे वस्रहरणकार श्री गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर मेळावा पार पडला.
या मेळाव्याला भंडारी समाज भजनसंघ जिल्हाध्यक्ष श्री श्रीकांतजी पाटील,डॉ. नागवेकर, श्री साईनाथ नागवेकर, श्री सुदेश नागवेकर व भंडारी हितवर्धक मंडळ राजापूरच्या अध्यक्षा सौ.अनामिका जाधव, सौ.प्रेरणा विलणकर, कोकणरत्न श्री संतोषजी शिरसेकर, श्री विश्वासजी करंगुटकर, श्री अमोल नार्वेकर उपस्थित होते.
श्री श्रीकांतजी पाटील यांनी मेळाव्यातील कलाकारांना मार्गदर्शन करताना तळागाळातील भजनीबुवा, पखवाजवादक, कीर्तनकार, नाटककार यासारख्या होतकरु कलाकारांना व्यासपीठ मिळवण्यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन दिलं. तसेच डॉ. नागवेकर यांनी संघटनेत काम करत असताना येणाऱ्या अडचणी, संघटनेपुढील उद्दिष्टे आणी संघटनेच्या विकासासाठी लागणारी उर्जा आपल्या भाषणातून व्यक्त केली.
मेळाव्याचे नियोजित अध्यक्ष श्री गंगाराम गवाणकर साहेब यांनी नाट्यक्षेत्रात काम करत असताना नाटककार आणी कलाकार म्हणून आलेले अनुभव नवोदित कलाकारांसमोर मांडले. कलावंताकडे उत्साह, चिकाटी,ध्येय आणी मनोबल असणं आवश्यक आहे.सदर कलावंतांच्या मेळाव्यासाठी नानांनी भरघोस देणगी जाहीर केली. या मेळाव्यामधे अनेक भजनी कलावंतांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार श्री प्रसाद पंगेरकर यांनी मानले. सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रसाद (बाळू) शिवणेकर यांनी केले. त्यांना उत्कृष्ट सुत्रसंचालक म्हणून भंडारी समाज कलाकार संघाच्यावतीने गौरविण्यात आले