(राजापूर / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील सागवे गोठीवरे परीसरात सकाळी 10 वा.पासून मोठा वणवा लागला होता, हा वणवा गोठीवरे फाटा ते ऐरमवाडीपर्यत सुमारे 5 किमी हा वणवा पसरला असल्याने येथील शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या परीसरातील सुमारे 35 शेतकऱ्यांची लागती कलमे जळून खाक झाली आहेत. यामुळे सुमारे 30 ते 35 लाख रूपये नुकसान झाल्याचा पाथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
ही आग तीन चार तास आधीच आग लागली असावी. पुढील दोन तीन तासात आग पाच किलोमीटर दूर वर पसरलेली पाहून लोकांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परंतु वाऱ्याच्यामुळे हापूस आंब्याच्या झाडांचे आगीत नुकसान झाले. अनेकांच्या, उटी, गवताचे भारे जळुन खाक झाले. आजुबाजुच्या गावातून आगीचे लोट दिसत होते. दुपार नंतर अथक प्रयत्नाने आग नियंत्रणात आणण्यात गावकऱ्यांना यश आले. शेतकऱ्यांनी रचून ठेवलेल्या वैरणही जळून खाक झाल्याने जनावरांच्या चारा पश्न उपस्थित झाला आहे.
या वणव्यामध्ये रमाकांत मोंडे, विजय रोकडे, श्री.करंजवकर, चंद्रकांत झोरे, निलेश हळदणकर, गितेश बांबरकर, नियाक नार्वेकर, अनंत सोडये यांच्यासहीत सुमारे 35 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.