(राजापूर/प्रतिनिधी)
राजापूर मंडळ- 1, मौजे – ओणी येथे 28 जुन रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय राजापूर कृषि संजिवनी सप्ताह निमित्त खतांचा संतुलित वापर दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रिसोर्स बँकेतील शेतकरी डॉ.श्री शैलेश शिंदेदेसाई यांनी रासायनिक खतांना पर्याय सेंद्रिय व हिरवळीच्या खतांचा वापर व भात शेतीत गिरीपुष्प वापराचे फायदे या विषय मार्गदर्शन केले. या वेळी तालुका कृषी अधिकारी श्री गावित साहेब यांनी आहारातील नाचणीचे महत्व, स्मार्ट व PMFME योजना, चारसुत्री भात लागवड, MREGS फळबाग लागवड योजना, कृषीक ॲप, दामिनी ॲप, तृण धान्याचे आहारातील महत्व, आवश्यकता, कृषि उत्पादनात भात पिकात कृषी यांत्रिकीकरण महत्व, नॅनो युरियाचा वापर व फायदे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस पाटील श्री संजय लिंगायत, प्रगतशील शेतकरी श्री नंदकुमार माळी, श्री एकनाथ मोंडें, मंडळ कृषी अधिकारी श्री डी.आर.झेंडे, कृषि पर्यवेक्षक श्री एस.डी.तांदळे, श्रीम.भांबिड, BTM श्री आंमरे, कृषी सहाय्यक श्री बि.के. इढोळे, श्री के. व्ही.मस्के व कृषि सेवक श्री डी. एल.सोनवणे, श्री डी. डी. शिंदे उपस्थीत होते. या कार्यक्रमाच्या शेवटी नाचणी बियाण्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर क्षेत्रीय भेटी दरम्यान आंबा ,काजू बाग ,काजू युनिट, गोट फार्म, शेततळे इत्यादी ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले.