(राजापूर / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील खडपेवाडी येथे 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी घडली. श्रीकांत शिवाजी खानविलकर (27, राजापूर, खडपेवाडी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास श्रीकांत खानविलकर याच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर त्याला उलटया होवू लागल्या. घरातील व्यक्तींनी त्याला प्रथम राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र आडिवरे येथे गाडी असता त्याची तब्येत अधिकच बिघडल्याने त्याला परत ग्रामीण रूग्णालय राजापूर येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.