( राजापूर / प्रतिनिधी )
राजापूरमधील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात पेशंट म्हणून गेलेल्या रुग्णाला डॉक्टरने अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अश्लील शिवीगाळ करणाऱ्या डॉक्टर विरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉ. अभिजीत पराडे असे गुन्हा दखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबतची तक्रार तुषार जाधव (४१ वर्ष , व्यवसाय शेती रा . पाचल, राजापूर) यांनी रायपाटण पोलिस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार जाधव हे 24 जुलै रोजी दुपारी 12.30 वा.चे सुमारास ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे उपचारासाठी गेले होते. त्यावेळी तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांनी नर्सकडे याविषयी विचारणा केली. त्यांनी डॉ. चव्हाण हे दोन दिवसांपूर्वी रजेचा अर्ज देवुन निघुन गेलेले आहेत व दुसरे डॉ. अभिजीत पराडे हे काही दिवसांपासून रजेवरती आहेत असे सांगितले. यानंतर तुषार जाधव यांनी डॉ. अभिजीत पराडे यांना रुग्णालयात कधी येणार असा फोन केला. सध्या माझी तब्येत ठिक नाही, मी सुट्टीवरती आहे असे सांगितले. याचवेळी पराडे यांनी डॉ. चव्हाण यांच्याबद्दल केलेल्या व्हॉट्सॲप पोस्टबद्दल विचारणा करून वाद घालण्याचा प्रयत्न केला व मला तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. तसेच अश्लील शिवीगाळही केली.
याबाबत जाधव यांनी रायपाटन पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी डॉ. पराडे यांच्याविरोधात भादविकलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला.