( राजापूर )
राजापूर न्यायालयात कौटुंबिक वादाच्या दिवाणी सुनावणीसाठी आलेल्या पत्नीला पतीने न्यायालयातच मारहाण केल्याची घटना राजापूरात घडली असून या प्रकरणी गाझिया शौबान बांगी यांनी पती सौबान बांगी यांच्या विरोधात राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.
साखरीनाटे वरचा मोहल्ला येथील गाझिया बांगी व सौबान बांगी हे नात्याने पती-पत्नी असून त्यांना ३ वर्षाची लहान मुलगी आहे. सौ. गाझिया यांना पहिले अपत्य मुलगी झाल्याने पती-पत्नी यांच्यात वाद होत होते. त्यामुळे सौ. गाझिया आपल्या माहेरी राहण्यास निघून गेल्या होत्या. तसेच त्यांनी पती सौबान व त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधात राजापूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणीसाठी दोघे पती-पत्नी न्यायालयात आले होते. याचवेळी न्यायदान कक्षाबाहेर पती सौबान याने सौ. गाझिया हीला शिवीगाळ करत पाठीमागून येवून मारहाण केली. तसेच मुलगी कु. फातीमा हिला देखील मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.