(जैतापूर / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील माडबन येथील प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मराठी मालिका, चित्रपट सृष्टीतील अग्गंबाई सासूबाई, जुळून येती रेशीमगाठी, अग्गंबाई सूनबाई, पिंजरा, फुलाला सुगंध मातीचा, पसंत आहे, मुलगी अधुरी एक कहाणी साहेब, बीबी आणि मी छोटी मालकीण, बॉस माझी लाडाची आदी मालिका मधून दिसणारे प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, कवी आणि साहित्यिक अशोक बागवे, वेटलिफ्टर आणि स्ट्रॉंगेस्ट वूमन ऑफ अशिया अनुजा तेंडोलकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. 96 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या जगप्रसिद्ध वस्त्रहरण या नाटकासह विठ्ठल विठ्ठल या नाटकाचे स्थानिक संचातील नाट्यप्रयोगही सादर होणार आहेत.
दिनांक 5 जानेवारी रोजी 10 वाजता माजी शिक्षक ,माजी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा. दुपारी 2:30 महिलांसाठी हळदीकुंकू आणि होम मिनिस्टर, 4 वाजता माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री 8 वाजता जगप्रसिद्ध विश्वविक्रमी वस्त्रहरण या नाटकाचा स्थानिक कलाकारांच्या संचातील नाटकाचा प्रयोग होणार आहे.
या कार्यक्रमाला राजापूरचे आमदार राजन साळवी, उपविभागीय अधिकारी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव, गटविकास अधिकारी सुहास पंडित, गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, सागरी पोलीस ठाणे नाटेचे सपोनि आबासाहेब पाटील आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन शतक महोत्सव कमिटी मुंबईचे अध्यक्ष शैलेश वाघधरे सचिव एडवोकेट दत्तराज शिरवडकर, खजिनदार मनोज वाघधरे, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष श्यामसुंदर गवाणकर, खजिनदार संदीप कदम, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व ग्रामस्थ व पालकांनी आणि शतक महोत्सव कमिटीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.