(चिपळूण /ओंकार रेळेकर)
राजस्थानी विष्णू समाज कोकण विभाग ट्रस्ट मंडळाचे कार्यकर्ते गेली अनेक वर्ष चिपळूणमध्ये आपल्या उद्योग व्यवसाय निमित्त स्थायिक झाले आहेत चिपळूण मधील सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असतो राजस्थानी विष्णू समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण आहोत त्यांना सर्वोत्तरी सहकार्य आपण करणार असल्याची ग्वाही आमदार शेखर निकम यांनी दिली.
चिपळूण मधील सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या राजस्थानी विष्णू समाज कोकण विभाग ट्रस्ट यांच्यावतीने येथे साजरा करण्यात आलेल्या नवरात्र उत्सव समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या नवरात्र उत्सव सोहळ्याला चिपळूण तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सोमवारी रात्री चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी मंडळाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी राजस्थानी विष्णू समाज कोकण विभाग ट्रस्टच्या वतीने आमदार शेखर निकम यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील श्री राजस्थानी विष्णू समाज (कोकण विभाग) ट्रस्टच्यावतीने खेर्डी देऊळवाडी येथे नवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त देऊळवाडी येथे १५ ते २३ ऑक्टोबर कालावधीत दांडिया, नृत्य कार्यक्रम संपन्न झाला. विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला भेट दिली. चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जयद्रथ खताते यांनी देखिल कार्यक्रमाला भेट दिली. श्री राजस्थानी, विष्णू समाज (कोकण विभाग) ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष ओमप्रकाश गेहलोत, गुलाबसिंग राठोड, पारसमल प्रजापत, विक्रम परमार, हिरालाल शिर्वी, गणेश शिर्वी, मिश्रीमल गुजर, बाबूलाल गेहलोत, रमेश प्रजापत, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.