( राजापूर )
राजापूर तालुक्यातील मूर या गावचे अविनाश सौंदळकर यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दक्षिण जिल्हाधक्ष पदी निवड झाली. याचं औचित्य साधून आणि त्यांचाअसलेला वाढदिवस यामुळे परिसरातील त्यांचे हितचिंतक तसेच मनसे च्या वतीने पाचल येथील मनसे कार्यालयात त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव सह उपतालुका अध्यक्ष मंगेश नारकर, विभाग अध्यक्ष संतोष काजारे उपविभाग अध्यक्ष विराज मोरे, राजू रेडीज, शाखा अध्यक्ष रवी नारकर, शाखा अध्यक्ष दिलदार प्रभुळकर, उपविभाग अध्यक्ष राकेश गुरव, शाखा अध्यक्ष दिगंबर केतकर, विभाग अध्यक्ष प्रभुदेसाई पत्रकार सुरेश गुडेकर सह काजीर्डा गावचे सरपंच अशोक आर्डे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
अविनाश सौंदळकर यांनी यापूर्वी पाचल सह तालुक्याच्या ठिकाणी अनेक आंदोलने करून तालुक्यासहित पूर्ण जिल्ह्यात आपलं लक्ष वेधलं होतं, ओणी पाचल अणुस्कुरा रस्त्याचे आंदोलन, कामदा खोरे प्रकल्प, यासारखी यशस्वी आंदोलने त्यांनी यापूर्वी केली आहेत. यामुळे आपल्या कामगिरी मुळे ते वरिष्टांच्या लक्षात राहिले आणि यामुळेच पक्षाने त्याच्यावर जिल्हाधक्ष हे पद देऊन त्यांच्यावरच जबादारी देखील वाढवली आहे.
राजापूर तालुक्यातील पाचल या गावी त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुसज्ज असे कार्यालय आहे. काही वर्षांपूर्वी या कार्यालयाचे उदघाटन पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते झाले होते, त्यामुळे राजसाहेबांच्या जवळच्या व्यक्तिमध्ये त्यांचा समावेश आहे. काल शुक्रवार 17 रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने परिसरातील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन पुढील राजकीय वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. या शुभ दिनी त्यांनी आपल्या पाचल येथील कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकना आपण राजकारणात असलो तरी राजकारण नावाला असून जास्तीत जास्त समाजसेवा करण्याच्या मी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याची कबुली त्यांनी दिली.