(मुंबई)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत २ मे रोजी गुप्त भेट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी फिरत आहे. या वृत्ताने महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे म्हटले जाते.
मात्र, या भेटीच्या वृत्ताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ‘श्रीमती रश्मी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवाशी माझी भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही भेट झालेली नाही.’ असं स्पष्टीकरण खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिलं आहे.
श्रीमती रश्मी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवाशी माझी भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही भेट झालेली नाही.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 5, 2023
मुख्यमंत्री शिंदे आणि रश्मी ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील याबद्दल ट्वीट करत खुलासा केला आहे. त्यांनी अशा बातम्या देणाऱ्या माध्यमांना देखील सुनावालं आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांना मा. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे भेटल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिध्द केले आहे. हे वृत्त निराधार आणि धादांत खोटे आहे. अशी कोणतीही भेट झालेली नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वृत्तांकन करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्याची सत्यता पडताळायला हवी. उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे माध्यमांकडून अपेक्षित नाही.” असे ट्वीट त्यांनी केलं आहे.
लोकांना खरी माहिती देण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमांनी खोट्या सूत्राचा आधार घेणे अपेक्षित नाही. त्यातून माध्यमांचीच विश्वासार्हता धोक्यात येते, हे ध्यानात घ्यावे असेही कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदें यांनी म्हटलं आहे.
This is a LIE. No secret meet.
Hon. CM Shri Eknath Shinde and Rashmi Thackeray ji NEVER met as shown on @NSMaharashtra. This is DESPERATION, nothing else. FALSE news.
We will Complain to Twitter and Police – several accounts spreading deliberate FAKE news & lies today This…— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) May 5, 2023