रत्नागिरी : परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्ताने रत्नागिरीकर भक्तांतर्फे रत्नागिरी ते पावस पदयात्रा (दिंडी) रविवार दि.२६ डिसेंबर रोजी पहाटे ४:३० वाजता निघणार आहे. शहरातील जयस्तंभ येथील नगर वाचनालयाच्या ठिकाणी या पदयात्रेला दिंडीला सुरुवात होणार आहे.
या दिंडीत सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात. गेली १८ वर्ष रत्नागिरीकर स्वामी भक्तांच्यावतीने हा पायी दिंडीचा उपक्रम सुरू आहे. स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम स्वामी भक्तांकडून नियमितपणे राबविला जात आहे. यावर्षी सलग १९ वे वर्ष आहे. तरी या दिंडीत सहभागी होण्यासाठी नगर वाचनालय येथे पहाटे साडेचार वाजता सर्वांनी उपस्थित राहायचे आहे. या दिंडीत सहभागी होण्यासाठी पांढरी टोपी अनिवार्य आहे. “मिटवून सारे भेदभाव चालत पावसला जाऊ, जाता जाता आरोग्याचा मंत्र मुखाने घेऊ” असे घोषवाक्य असलेल्या या दिंडीत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे. पदयात्रेच्या सहभागासाठी अनंत आगाशे ७०८३१६२९७५, राजन पटवर्धन ९८६०३६६९९१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.