(नवी दिल्ली)
जगभरात सध्या रमजान सण वेगवेगळ्या देशांमध्ये साजरा केला जात आहे. इस्लाम धर्मातील रमजान हा मोठा सण मानला जातो. या सणालाच रमजान निमित्तानं मक्काला निघालेल्या यात्रेकरुंच्या बसचा मोठा अपघात झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या अपघातात बसला भीषण आग लागली आणि 20 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजानच्या पहिल्याच आठवड्यात सौदी अरेबियातून ही एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे.
Very sad
Horrific accident in #SaudiArabia
At least 20 people have been killed and about 30 others injured in a bus crash in Saudi Arabia.Dur to malfunction of the brake system the bus lost control and collided with a passenger car, and then rolled over and caught fire pic.twitter.com/ZpsA0Duf0M— Arthur Morgan (@ArthurM40330824) March 27, 2023
इस्लामिक देशातील उमराहसाठी पवित्र शहर मक्का इथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल २० भविकांचा होरपळून मृत्यू झाला. तर २९ भाविक हे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृत व्यक्ति नेमके कुठले होते, या बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बस पुलावर आदळली आणि त्यानंतर भीषण आग लागली. या आगीत 20 यात्रेकरु होरपळले, तर ३० जण जखमी झाले आहेत.
ही घटना सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील असीर प्रांतात घडली. ही बस सर्व भाविकांना मक्का आणि मदिण येथे घेऊन जात होती. या घटनेचा एक व्हिडिओ देखील पुढे आला असून या अपघाताची भीषणता यातून दिसत आहे. संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
रमजान महिन्यात लाखो मुस्लिम उमराहसाठी मक्का शहराकडे येत असतात. त्यामुळे सौदीतील रस्ते वर्दळीचे होऊन अनेक अपघात होतात. यादरम्यान सौदी अरेबियातही ट्रॅफिक जामची समस्या उद्भवते.