( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील वाटद-किंजळेवाडी येथील जंगलमय भागातवि नापरवाना हातभट्टीची गावठी दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक काशीराम किंजळे (वय ५४, रा. किंजळेवाडी-वाटद, ता. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २४) रात्री आठच्या सुमारास किंजळेवाडी येथील जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनायक किंजळे यांच्याकडे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिस शिपाई बाळकृष्ण खोत यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.