(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी रेल्वे स्थानक व शहरातील जयस्तंभ येथे शेअर रिक्षा थांबे उभारण्यास परवानगी मिळावी यासाठी मनसे रत्नागिरीतर्फे सोमवारी (दिनांक १६ ऑक्टोबर २०२३) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
नुकतीच रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात शेअरिंग रिक्षाचालकाला संस्थानिक दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांच्या झुंडीने मारहाण केली होती. यामुळे आता शेअरिंग रिक्षाचालकांना रत्नागिरीत सर्वच ठिकाणी थांबा मिळावा अशी मागणी रिक्षाचालकांमधून होत आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील रिक्षा व्यावसायिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या होत्या. यावेळी रत्नागिरीत शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या ही लक्षणीय असल्याने रत्नागिरी रेल्वे स्थानक व जयस्तंभ येथे शेअर रिक्षा चालकांसाठी थांबा असावा ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर सचिव अजिंक्य केसरकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, मनविसे शहर अध्यक्ष तेजस साळवी, अनंत शिंदे रिक्षाचालक इमरान नेवरेकर, मोहोम्मद रिजवान, महेंद्र शिंदे, विनायक शिंदे, नितिन चेचरे, सचिन रांबाडे, वैभव बेंद्रे, प्रशांत साळुंखे, प्रणव साळुंखे, नवनाथ कुड आदी उपस्थित होते