रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्ह्याध्यक्षा चित्राताई चव्हाण यांची ओळख एक आक्रमक व अभ्यासू महिला नेतृत्व म्हणून पाहिले जाते. रत्नागिरी जिल्हयातील महिलांवरील अन्यायाविरोधात व पक्ष संघटनेविषयी आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या चित्राताई चव्हाण म्हणून ओळखल्या जातात. विरोधी पक्षाशी 27 वर्षे संघर्ष करून रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिलांची मोट चित्राताई चव्हाण यांनी एकनिष्ठेने बांधून महिला संघटन मजबूत केले.
अशा या महिला जिल्ह्याध्यक्षा चित्राताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा देताना रा.काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक सदस्य बशीरभाई मुर्तुझा, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जुबेरभाई काझी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, युवक तालुकाध्यक्ष सिध्देश शिवलकर, महिला तालुकाध्यक्षा शमीमताई नाईक, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मेहबूब मोगल, अल्पसंख्याक महिला शहराध्यक्षा सायमाताई काझी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बशीरभाई मुर्तुझा व राजन सुर्वे यांनी महिला जिल्ह्याध्यक्ष चित्राताईं चव्हाणांचे जिल्हयातील काम पाहून मनभरून कौतुक केले व पुढील राजकीय प्रवासाला शुभेच्छा दिल्या.