रत्नागिरी : पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने पर्यटन विभाग , महाराष्ट्र शासनच्या पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, नवी मुंबईच्यावतीने दिनांक 14 मार्च 2022 ते 18 मार्च 2022 या 5 दिवसाच्या प्रशिक्षण रत्नागिरी येथे हॉटेल सी फॅन्स मांडवी बीच या ठिकाणी गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन श्री रमेश कीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री उदय लोध, उपाध्यक्ष रत्नागिरी हॉटेल असोसिएशन तथा संचालक हॉटेल राधा, संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे, आय आय टी टी एम ग्वाल्हेर चे डॉ. चंद्रशेखर बरुवा, श्री सुहास ठाकूर देसाई संचालक हॉटेल सी फॅन आणि श्री सुधीर रिसबूड अभ्यासक कातळ शिल्प इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री रमेश कीर म्हणाले की, रत्नागिरी भागातील संस्कृती, इतिहास, लोकजीवन आणि निसर्गसंपदा यांची ओळख करून घ्यावी. ईश्वराने आपल्या कोकणावर निसर्ग, प्राणी, पक्षी यांची विपुल प्रमाणात उधळण केली आहे. या संधीचा सुयोग्य वापर करून प्रशिक्षणार्थ्यांनी तिचे सोने करावे. त्याचप्रमाणे गाईड आणि हॉटेल यांनी एकमेकाशी समन्वय साधून येथे गाईडची जी मागणी आहे ती या गाईडने पूर्ण करावी. त्याच प्रमाणे या परिसरात असलेल्या पर्यटन स्थळाची ऐतिहासिक माहिती गोळा करून आणि बोलण्यामध्ये भाषेचा चांगला वापर करून त्या पर्यटन स्थळाला बोलके करावे. आपण एक उत्कृष्ट गाईड तयार व्हावे असे आवाहन करून प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
तसेच या कार्यक्रमात श्री हनुमंत हेडे, उपसंचालक (पर्यटन)कोकण विभाग नवी मुंबई म्हणाले, की स्थानिक युवकांना पर्यटक गाईड प्रशिक्षण देऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे त्याच प्रमाणे गाईड हा पर्यटन स्थळ परिसरातील अत्यंत अचूक आणि महत्त्वाची माहिती देत असतो. तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मन लावून हे प्रशिक्षण घ्यावे. आलेल्या संधीचा उपयोग करून घेण्याचे आव्हान श्री हेडे यांनी केले. या प्रशिक्षण कालावधीत पर्यटन संचालनालयामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र ही देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !