(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी – पावस मार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. स्मितेश दिलीप जोशी (28, काळबादेवी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अन्य दोघेजण गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, रविवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास स्मितेश जोशी आणि प्रसाद राउळ (25, काळबादेवी) हे दोघे दुचाकीवरुन पावसहून रत्नागिरीच्या दिशेने येत होते. हे दोघे फिनोलेक्स फाटा येथे आले असताना रत्नागिरीहून पावसच्या दिशेने जाणार्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत स्मितेश जोशी याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला प्रसाद राउळ हा गंभीर जखमी झाला. तर दुसर्या दुचाकीवरील बासीन भट्टीवाले हाही गंभीर जखमी झाला.त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्मितेश हा काळबादेवी येथील आहे. तो मुंबई येथे कामाला असून दिवाळी निमित्त गावी आला होता, असे त्याच्या नातेवाईंकांकडे समजते.