( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील निरुळ येथे एका 4 वर्षीय बालकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बालकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वीर प्रदीप माटल (4 वर्ष, 2 महिने, निरुळ, ठोकवाडी) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरुळ येथे माटल कुटुंब भात कापणीसाठी शेतात गेले होते. यावेळी 4 वर्षाच्या वीरला त्यांनी शेत्तात नेले होते. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आई वडील शेतात काम करत असताना वीर हा शेतात खेळत होता. खेळत दंग असताना खेळात दंग असताना कोब्रा सापाने त्याच्या पायाला दंश केला. लगेचच दुसऱ्या वेळी पुन्हा दंश केला. वीरने लगेचच ओरडायला सुरुवात केली. सैरभैर धावत होता. मुलाला ओरडताना पाहून आई वडील त्या दिशेने धावत गेले. कोण चावल असेल याची कल्पना सुद्धा त्यांना नव्हती. ते शोधाशोध घेऊ लागले. मात्र त्यांना काहीच दिसून आले नाही. तेवढ्यात एका बिळाकडे त्यांचे लक्ष गेले. तिथे साप असल्याचे त्यांना दिसून आले. तोपर्यंत वीरला अस्वस्थ वाटू लागले. तो निळा पडत चालला होता. त्यांनी लगेचच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच 3 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने आई वडिलांना धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबतची फिर्याद विर च्या वडिलांनी पूर्णगड पोलिस स्थानकात दिली.