( रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील धनजीनाका येथील शब्बीर मेस्त्री यांच्या गॅरेजमधून दुचाकी चोरीस गेल्याची घटना ५ फेब्रुवारी रात्री ८ ते ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद मुरलीधर रामचंद्र भोसले (२७, नोकरी, मूळ हातकणंगले, कोल्हापूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर भोसले यांनी आपल्या भावाची मोटरसायकल अपघातानंतर दुरुस्तीकरीता शब्बीर मेस्त्री धनजीनाका यांच्याकडे दिलेली होती. मात्र शब्बीर यांचे दुकान बंद असताना ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान भोसले यांची दुचाकी चोरीस गेली. याबाबत मुरलीधर भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.