(रत्नागिरी)
TWJ – द सोशल रिफॉर्स, रत्नगिरी, TWJ इव्हेंट्स आणि प्रभात चित्रमंडळ यांच्या संयुक्त विदयमाने दि. 20 ते 22 मे, 2022 दरम्यान “द टॉकींग फ्रेम्स” या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेचे रत्नागिरी येथे आयोजन करण्यात येत आहे. ट ही संस्था विविध सामाजिक क्षेत्रात चिपळूण, देवरुख सातारा व पुणे येथे कार्यरत असून ह्या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी येथे आपले कार्य सुरु करीत आहे. रत्नागिरी शहर हे कलेची आणि कलावंतांची कदर करणारी जागा आहे. इथे चित्रपट रसास्वादाची परंपरा सुरु करावी, जसा नाट्य आणि संगीत क्षेत्रासाठी एक हक्काचा प्रेक्षकवर्ग रत्नागिरीत आहे तसाच उत्तम चित्रपटांसाठी देखिल चोखंदळ प्रेक्षकवर्ग निर्माण व्हावा हा या चित्रपट महोत्सवामागील हेतू आहे.
ह्या महोत्सवात लघुपट स्पर्धा देखील भरवण्यात येत आहेत. या उत्तम २० लघुपटांची निवड ह्या स्पर्धेकरीता करण्यात आली आहे. महोत्सवाच्या अंती, सर्वोत्कृष्ट लघुपट, दिग्दर्शक, छायाचित्रकार, संगीत, संकलन आदि विजेत्याना गौरवण्यात येणार आहे.
ह्या चित्रपट महोत्सवाबद्दल अधिक महिती देण्याकरीता आज दि. १३ मे २०२२ रोजी, संध्याकाळी ठीक ४.३० वाजता TWJ रत्नागिरी कार्यालय, अभ्युदय नगर, नाचणे रोड येथे पत्रकार परिषदमध्ये होणार असून श्री. संतोष पाठारे (क्यूरेटर व क्रिएटिव हेड), श्री. शोनील यल्लातीकर (क्रिएटिव डायरेक्टर), प्रसन्न करंदिकर (फेस्टिवल डायरेक्टर) आणि श्री. विजय पाताडे (TWJ रत्नगिरी बॅन्च मॅनेजर) हे या कार्यक्रमाची अधिक माहिती देणार आहेत.