(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन व रत्नागिरी तालुका फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन यांच्यावतीने आयोजित स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.
गेल्या दोन वर्षांत कोरोना कालावधीत अनेक व्यावसायिकांसह फोटोग्राफर व्यावसायिक ही मोठ्या संकटात सापडले होते,काय करावे याच्या विवंचनेत होते.अशा या द्विधा मनस्थितीत असणा-या फोटोग्राफर व्हिडीओग्राफर व्यावसायिकांना त्यांना मानसिक बळ मिळावे, अडचणींतून मार्ग काढावे यासाठी जिल्ह्यातील फोटोग्राफर व्हिडीओग्राफर व्यावसायिकांना एकत्रित आणून मनमोकळेपणाने चर्चा करावी या हेतूने रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन व रत्नागिरी तालुका फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन यांचे वतीने स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. सकाळच्या पहिल्या सत्रात रत्नागिरी तालुका असोसिएशनच्या वतीने अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सभासदांना सभासद प्रमाणपत्र व आयडी कार्ड देण्यात आले. प्रारंभी कोरोना कालावधीत जे दिवंगत झाले अशांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब सासणे [ खेड ], संजय शिंदे [ चिपळूण ], सुरेंद्र गीते [संगमेश्वर], विजय पिंपळकर [ मंडणगड], प्रवीण पाटोळे [ लांजा], राजेश खांबल [राजापूर], संतोष आगरे [ गुहागर ], सचिन सावंत [ रत्नागिरी ] आदी जिल्ह्यांतील प्रमुख उपस्थित होते. गुरु चौगुले यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. कांचन मालगुंडकर यांनी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे असल्याने अशा प्रकारचे कार्यक्रम सतत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. संजय शिंदे यांनी ही या व्यवसायात जिल्हा स्तरावर एक संघटना असणे आवश्यक असून त्याची आजच मूहुर्तमेढ करावी असे आवाहन केले. अवधूत कलबुर्गी यांनी अल्बम चे प्रात्यक्षिक दाखवून फोटोग्राफी मधील अचूकतेची माहिती दिली.
दुस-या सत्रात निरीपजी को ऑप क्रेडिट सोसायटी चे अध्यक्ष भूपेशजी मोरे यांनी माझी पतसंस्था फोटोग्राफर व्हिडीओग्राफर व्यावसायिकांच्या मागे खंबीरपणे उभी राहिल असे अभिवचन दिले.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन दरवर्षी अनेक उपक्रम राबवित असते, फोटोग्राफर मेळावे, प्रशिक्षण यासोबतच सामाजिक कार्य ही करीत असते. चिपळूण मधील आपदग्रस्त फोटोग्राफर व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा हात ही दिला गेला. महिला दिनानिमित्त रत्नागिरी शहरातील भाजी विक्रेत्या गरीब महिलांना साडी, अनाथाश्रमामध्ये गरजेचे वस्तू असे अनेक सामाजिक उपक्रम रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन करीत असते त्यामुळे रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन ची नियमानुसार नोंदणी करावी असे सर्वांनीच सुचविले व जिल्हा कार्यकारिणी तयार करुन त्याची मूहुर्तमेढ करण्यात आली.