(चिपळूण)
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आणि श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे आर. एम. धारीवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल, कोंढापुरी (शिरूर) पुणे आयोजित सातवे पर्यावरण संमेलन कोंढापुरी येथे पर्यावरणीय प्रबोधन कार्यात सातत्याने योगदान दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळास हा पुरस्कार संमेलन अध्यक्ष ‘प्रसिद्ध हवामान अभ्यासक’ पंजाबराव डख यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक आर्थिक गुन्हे व सीआयडी पुणेचे पोलिस अधीक्षक आयपीएस अधिकारी पंकज देशमुख, राज देशमुख (संस्थापक अध्यक्ष चांगुलपणाची चळवळ), कोंढापुरी विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, कोंढापुरीच्या सरपंच अपेक्षा गायकवाड, आर. एम. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल कोंढापूरीच्या कॅम्पस डायरेक्टर डॉ. अनिता माने, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे गुणवरे उपस्थित होते. हा पुरस्कार निसर्ग व पर्यावरण मंडळाचे वरिष्ठ राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक, राज्य सचिव धीरज वाटेकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतिश मुणगेकर, मायावती शिपटे, विनया देवरुखकर, ओंकार शिपटे, तृषाली कदम, मोहन पाटील यांनी स्वीकारला.
रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळाच्या सदस्यांनी मागील वर्षभरात आपापल्या कार्यक्षेत्रात सातत्याने विविध पर्यावरणपूरक जनजागृती उपक्रम राबविले. न्यू इंग्लिश स्कूल मांडकी, पेढे निसर्ग पर्यटन केंद्र महाराष्ट्र कृषी दिन, लक्ष्मीबाई बांदल इंग्लिश मिडीयम स्कूल, नूतन प्राथमिक विद्यालय लोटे पर्यावरण विषयक स्पर्धा, कृषिदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल आंबडस येथे वृक्षारोपण आणि दिंडी, चारगाव देवस्थान ट्रस्ट निरबाडे, खांदाटपाली, काडवली येथे वृक्षारोपण, न्यू इंग्लिश स्कूल तिवरे येथे ग्रामस्थांच्या मदतीने वृक्षारोपण, तिवरे येथे मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक व ‘वनश्री’ महेंद्र घागरे यांच्या सहकार्याने बीजारोपण, चिपळूण तालुका विज्ञान मंडळाच्या साहाय्याने पर्यावरण जनजागृती उपक्रम, जिल्हाध्यक्ष सतिश मुणगेकर यांच्याकडून गुहागर तालुक्यातील शाळांना रोप वाटप, श्री रामवरदायिनी विद्यालय निरबाडे येथे ओझोन दिन, वाशिष्ठी तीरावर धीरज वाटेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन, सह्याद्री कुशीतील श्रावणसरी कार्यक्रम आदी उपक्रमांचा समावेश होता.