(रत्नागिरी)
रत्नागिरी नगरीचे वैभव असणारे 1828 साली स्थापन झालेले रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय त्यावेळी नेटिव्ह लायब्ररी म्हणून ओळखले जात होते. आज 196 वर्ष वाचकांना त्यांचे ग्रंथ उपलब्ध करून देण्याचे आणि रत्ननगरीचे सुसंस्कृतपण अबाधित ठेवण्यात हे वाचनालय योगदान देत आले आहे.
साहित्यिक विविधतेने भरगच्च वाचनमंदीर
विविध वाङ्मय प्रकारची बहुरंगी पुस्तके या वाचनालयात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील मोजकी वाचनमंदिरे 1लक्ष पुस्तक संख्या असलेली आहेत अश्या वाचनालयाच्या श्रेणीत रत्नागिरी जिल्हा नागरवाचनालय हे वाचनालय येते. 1 लाख 11 हजारांची ग्रंथ संपदा हे या वाचनालयाचे वैभव आहे.
वाचक संख्या वाढवणेसाठी चळवळ
द्विशताब्दी कडे वाटचाल करणाऱ्या या वाचनालयाचे वाचक सभासद प्रत्येक नागरिकाने व्हावे असे विनम्र आवाहन सर्वाना करत आहे. दि. 1 जुलै ते 15 ऑगस्ट23 या कालावधीत वाचक सभासद वाढवण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. 200 वर्षांची परंपरा असलेल्या या वाचनमंदिराचे वाचक सभासद होणे ही प्रत्येकासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. 1 जुलै पासून वाचनालया चे वाचक सभासद करून घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल. हायस्कुल महाविद्यालये येथील अध्यपक वर्ग शासकीय निमशासकीय अधिकारी,प्रतिथयश व्यावसाईक, शहरातील बुद्धिजीवी वर्ग रत्नागिरीतील शिक्षण संस्था सामाजिक संस्था सांस्कृतिक मंडळे विविध संस्थांचे पदाधिकारी धार्मिक संस्था त्यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने युवा वर्ग या सर्वांना सम्पर्क करून त्यांना वाचनालयाबरोबर संलग्न करून घेण्यात येईल, असे दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
विविध उपक्रमातून जागृतीचा प्रयत्न
वाचक चळवळ अधिक लोकप्रिय व्हावी या साठी विविध उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय राबवले उत्कृष्ट वाचक पुरस्कार, साहित्यिक कट्टा, पुस्तक परीक्षण स्पर्धा, ग्रंथमित्र पुरस्कार, लेखक आपल्या भेटीला असे विविध उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय सातत्याने राबवले जातात. ग्रंथ मित्र योजनेत ग्रँथ मित्रांचे ग्रुप तयार करून वाचनालयातील जुनी ग्रंथ संपदा त्यांना उपलब्ध करून देऊन जुन्या दुर्मिळ पुस्तकाना परत एकदा चर्चेत आणि वाचनात आणण्याचा प्रयत्न राहील.रत्नागिरीतील व्यासंगी वाचकांची सूची तयार करण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले.
दरवर्षी जीवनगौरव प्रदान करणार
दरवर्षी ऐका सन्माननीय कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. सुसंस्कृत रत्नागिरीची प्रतिमा जपत व्यासंगी वाचक वाढते ठेवण्यासाठी आणि रत्नागिरीचे मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र म्हणून जिल्हा नगर वाचनालय कार्यरत राहील अशी योजना तयार करत असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी दिली.