( रत्नागिरी )
रत्नागिरी तालुक्यातील जयगड पेठवाडी येथे गळफास घेवून वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास घडल़ी. वनमाळी शिवराम मयेकर (65, ऱा जयगड पेठवाडी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आह़े. या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनमाळी 18 मार्च 2023 रोजी सायंकाळी 7.45 च्या सुमारास राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल़े. यावेळी नातेवाईकांनी त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केल़े. यावेळी डॉक्टरांनी वनमाळी यांना तपासून मृत घोषित केल़े.