( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे- जुवळेवाडी येथील झोपडीजवळ हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या वृद्ध महिलेविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २४) दुपारी अडीचच्या सुमारास निदर्शनास आली. संशयित महिला अरुणा अनंत गोलटकर (वय ६२) या जुवळेवाडी येथील झोपडीच्या जवळ लाकडाच्या आडोशाला विनापरवान हातभट्टीची दारु विक्री करताना आढळल्या. पोलिसांनी तिच्याकडून रोख रक्कम व साहित्य जप्त केले असून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.