(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी समुद्रकिनारी दर्जा जेटीजवळ अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आल़ा. ही घटना गुरूवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सागरी सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आल़ी. सडलेल्या अवस्थेत असलेल्या या मृतदेहाची अद्याप ओळख करण्यात आलेली नाह़ी. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास काळबादेवी दर्जा जेटीजवळ 50 ते 55 वर्षीय पुरूषाचा मृतदेह सागरी सुरक्षा रक्षकांना दिसून आल़ा. त्यानुसार या घटनेची माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना देण्यात आल़ी आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख होवू शकलेली नाह़ी. दरम्यान पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आह़े.