(रत्नागिरी)
रत्नागिरीच्या अपर जिल्हाधिकारीपदी बदली झालेले शंकर बर्गे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अपर जिल्हाधिकारीपदी शंकर बर्गे यांची बदली झाली आहे.
त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा आले. यापूर्वी अपर जिल्हाधिकारी असलेले संजय शिंदे यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त पदावर शंकर बर्गे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी रत्नागिरीत निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर तीन वर्षे काम केले आहे. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणूनही काम केले आहे. यापूर्वी ते सिंधुदुर्ग येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.