(रत्नागिरी)
अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा सादर केलेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षाचे स्वप्न सत्यात उतरणार असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. विलास पाटणे यांनी व्यक्त केली.
अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये कोकणवासियांना भरभरून दिले आहे. गडसंवर्धनासाठी ३०० कोटींची तरतूद, विरार अलिबाग नव्या कॉरडॉरसाठी ४० हजार कोटी तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरीत इकॉनॉमी पार्क सुरू होत असल्याने शिपब्रेकींग युनिट उद्योग उभा राहून रोजगार वाढणा आहे. शैवालशेती प्रोत्साहन योजना चांगली असल्याची प्रतिक्रिया ॲड. विलास पाटणे यांनी व्यक्त केली आहे.
१३४५ कोटीची काजू प्रक्रिया उद्योगसहाय उपलब्ध झाल्याने काजू उद्योजक स्थिरावणार आहेत. रेवस-रेड्डी सागरी महामार्ग तरतुदींचे स्वागत आहे. या सागरी महामार्गामुळे कोकणातील पर्यटनविकास वाढेल. पारंपरिक मच्छीमार व्यावसायिकांना पाच लाख विमा सुरक्षा मिळाली आहे. अर्थाबरोबर संकल्प असल्याने त्याचे स्वागतच करीत असल्याचे ॲड. विलास पाटणे यांनी सांगितले.